मालवणी मसाला

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जानेवारी २०१८

मालवणी मसाला प्रकार | Malvani Masala

मालवणी मसाल्याची पाककृती - [Malvani Masala Recipe] मुळचा कोकणातल्या मालवणचा असलेला हा ‘मालवणी मसाला’ रंगाने अत्यंत लालसर आणि चवीला तितकाच तिखट असतो. ‘मालवणी मसाला’ हा मुख्यतः झणझणीत आणि तिखट पदार्थ बनविण्यासाठी वापरला जातो.

जिन्नस


  • १/२ किलो धणे
  • १० ग्रॅम दालचिनी
  • १० ग्रॅम लवंग
  • १० ग्रॅम बाद्यान (बदामफुले)
  • १० ग्रॅम नागकेशर
  • १० ग्रॅम तमालपत्रे
  • १० ग्रॅम जीरे
  • १० ग्रॅम मोहरी
  • १० ग्रॅम काळे मिरे
  • १० ग्रॅम बडीशेप
  • ४ - ५ मसालेचे वेलदोडे
  • ५ ग्रॅम जायपत्री
  • ५ ग्रॅम शहाजिरे

पाककृती


  • प्रथम वरील सर्व साहित्य निवडून घ्या.
  • सर्व साहित्य थोडया तेलावर भाजून घ्या.
  • भाजून झाल्यावर बाजूला थंड करायला ठेवा.
  • थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक पूड करुन घ्या.
  • तयार मालवणी मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.