MarathiMati.com - Android App on Google Play Store

मजेदार कटलेट्स

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जानेवारी २००८

मजेदार कटलेट्स

मजेदार कटलेट्स - [Majedar Cutlets] तयार भात, उसळी तसेच ब्रेड व भाज्यांनी उपयुक्त असे ‘मजेदार कटलेट्स’ न्याहारी किंवा मधल्या वेळेत मुलांना खायला देता येईल.

जिन्नस


  • १ वाटी तयार भात
  • १ वाटी सुक्या वाटाण्यांची उसळ
  • ४ ब्रेडचे स्लाईस
  • १ वाटी वाफवलेला कोबी
  • २ मोठे कांदे
  • १ इंच आले
  • ४/५ हिरव्या मिरच्या
  • २-३ डाव चण्याच्या डाळीचे पीठ
  • थोडा रवा
  • मीठ

पाककृती


कांदा बारीक चिरुन घ्यावा व थोड्या तेलावर परतवून घ्यावा. आले व मिरच्याही बारीक चिराव्यात.

नंतर रवा सोडून इतर सर्व वस्तू एकत्र कराव्यात व त्याचे लिंबाएवढे गोळे तयार करावेत.

एका छोट्या डिशमध्ये थोडासा रवा टाकून वरील तयार केलेल्या पिठाचा एक गोळा त्यात ठेवून बोटांनी जरा जरा चपटा करावा. वरही थोडा रवा घालावा व कागदावर उपडे करावे म्हणजे छान गोल आकाराचे कटलेट तयार होईल.

त्याच्या कडाही रव्यात घोळाव्यात. ३-४ कटलेट तयार झाली की तव्यावर १ डाव तेल टाकून तांबूस रंगावर तळून घ्यावीत.

चिंचेच्या चटाणीसोबत खावीत. फार छान लागतात.

वाट्याण्याची उसळ नसल्यास इतर कुठलीही उसळ चालेल.

MarathiMati.com - Android App on Google Play Store