माँ दी दाल
माँ दी दाल - [Maa Di Dal] पंजाबी ‘माँ दी दाल’ घरच्या घरी तयार...!
जिन्नस
- १ कप उडीद डाळ
- १/२ कप राजमा
- ४ कप पाणी
- १ तुकडा कापलेले आले
- ४ पाकळी कापलेला लसुण
- १ कापलेला कांदा
- ३/४ चमच गरम मसाला
- २ कापलेली हिरवी मिरची
- १/२ चमचे हळद
- १ चमचा मीठ
- २ मोठे चमचे तेल
- ३/४ चमचे जीरे
- १ जुडी कापलेली कोथिंबीर
- २ मोठी कापलेली टोमॅटो
- ३/४ चमचे लाल मिरची
पाककृती
उडीद व राजम्यास ४ कप पाणी व एक चुटकी मीठ टाकुन उकळावे. तेल गरम करून जीरे टाकावे.
नंतर कांदा, लसूण, आले व हिरवी मिरची फ्राय करावी. मीठ, वाटलेली लाल मिरची व हळद टाकून एक मिनीट फ्राय करावे, नंतर टोमॅटो टाकावे.
३ मिनीटानंतर उकळलेली डाळ टाकावी आणि चमच्याने चांगली घोटावी, ४-५ मिनीट उकळल्यानंतर कोथिंबीर व गरम मसाला टाकावा आणि तंदूरी पोळी बरोबर गरम गरम खावी.