लिंबांच्या सालीचे लोणचे

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ७ जानेवारी २००८

लिंबांच्या सालीचे लोणचे

मिक्स भाज्यांचे सांडगे - [Mix Bhajyanche Sandage] लिंबूमध्ये असलेले ‘क’ जीवनसत्त्व त्याच्या सालीमध्ये जास्त प्रमाणात आढळते त्यासाठी तिखट-गोड असे बनवलेले लिंबाच्या सालीचे लोणचे चवीला सुंदर लागते आणि पचायलाही हलके असते.

साहित्य

  • २०-२५ लिंबांच्या साली
  • १ वाटी मीठ
  • पाव वाटी लाल तिखट
  • २ वाट्या साखर

कृती

एका वेळेस इतकी सगळी लिंबे हवीत असे नाही. रोजच्या वापरात लिंबाचा रस काढून झाला की सालीचे चार तुकडे जराश्या मीठात घोळवावे व एका घट्ट झांकणाच्या मोठ्या बाटलीत भरावे.

साली साठत जातील तशा मीठात घोळवून बाटलीत भराव्या आवश्यक वाटल्यास थोडे जास्त मीठ घालावे.

सर्व जिन्नस एका थाळ्यात किंवा तसराळ्यात कालवावे. बाटलीतल्या सालीही त्यात मिसळाव्या.

रुंद तोंडाच्या बरणीत हे मिश्रण भरावे. चौपदरी मलमली फडक्याचा दादरा बांधावा व बरणी ८-१० दिवस उन्हात ठेवावी.

संध्याकाळी उचलून घरात ठेवताना बरणी हलवावी. दहा दिवसानंतर दादरा सोडून झाकण लावावे.

झाकणावरून दुसरा दादरा बांधावा. लोणच्याचा रंग बदलला की ते तयार झाले असे समजावे.

आवश्यक वाटल्यास मीठ व साखर थोडी जास्त घालावी.

या विभागातील नवीन लेखन

चिकन बिर्याणी | Chicken Biryani

स्वीट कॉर्न सूप | Sweet Corn Soup

स्वीट कॉर्न सूप

विभाग पाककला

मटण हंडी | Mutton Handi

मटण हंडी

विभाग पाककला

comments powered by Disqus