लेमन स्क्वॅश

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २००८

लेमन स्क्वॅश

लेमन स्क्वॅश - [Lemon Squash] पचनसंस्था सुधारणारे व व्हिटामिन क (सी) असलेले लिंबाचे ‘लेमन स्क्वॅश’ उन्हाळ्यातील अत्यंत आरोग्यवर्धक असं थंडपेय आहे.

जिन्नस


  • २ किलो लिंबू
  • २ किलो साखर
  • १ लि. पाणी
  • पिवळा रंग
  • पाव चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट

पाककृती


साखर व पाणी उकळा. एका तारेचा पाक तयार झाल्यावर गॅस बंद करा.

पाक थंड झाल्यावर लिंबाचा रस काढून यात मिसळा. पिवळा रंग, पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्या.

एका ग्लासात पाणी व बर्फ टाका. थोडा स्क्वॅश मिसळून सर्व्ह करा.

लिंबाचा रस आधीपासून काढून ठेवल्यास कडवट होतो, तेव्हा ऐनवेळी टाकून मिसळा.