लेमन डिलिशियस पुडिंग

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ स| ७ जानेवारी २००८

लेमन डिलिशियस पुडिंग

लेमन डिलिशियस पुडिंग - [Lemon Delicious Pudding] लोणी, लिंबू, अंडे घालून तयार केलेले लेमन डिलिशियस पुडिंग डेझर्ट म्हणुन खाता येते.

जिन्नस


  • २ मोठे चमचे पांढरे लोणी
  • पाऊण वाटी साखर
  • १ मोठे लिंबू
  • १ कप दूध
  • २ अंडे
  • २ मोठे चमचे मैदा
  • एक चिमटी मीठ.

पाककृती


अंड्यातले पिवळे व पांढरे वेगवेगळे फेसावे. लोणी व साखर मिसळून हाताने किंवा मिक्सरमध्ये खूप फेसावे.

मैदा मीठ घालून चाळून घ्यावा. लिंबाची साल कापून किसून घ्यावी व लिंबाचा रस काढून वेगळा ठेवावा.

लोणी-साखरेत चाळलेला मैदा, लिंबाच्या सालीचा कीस, लिंबाचा रस, अंड्यातले पिवळे व दूध घालून मिश्रण घोटून घ्यावे.

अंड्यातले फेसलेले पांढरे हळूहळू मिश्रणात घालून पुन्हा एकजीव होईपर्यंत घोटावे. ओव्हनमध्ये ठेवण्यासाठी ओव्हनप्रूफ भांडे आतल्या बाजूने ओले करावे व त्यात हे मिश्रण ओतावे.

दुसऱ्या एका उथळ भांड्यात किंवा ट्रेमध्ये पाणी घालून त्यात मिश्रणाचे भांडे ठेवावे. मध्यम ओव्हनमध्ये ३० ते ४० मिनिटे भाजावे.

हे पुडिंग काळजीपूर्वक व शांतपणाने करावे. चवीला खूप छान लागते.