कुळीथ पिठले

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १० जानेवारी २००८

कुळीथ पिठले

कुळीथ पिठले - [Kulith Pithale] रात्रीच्या जेवणात उत्तम असे महाराष्ट्रीयन पदार्थ असलेले तिखट-आंबटसर ‘कुळीथाचे पिठले’ भातावर सुंदर लागते.

जिन्नस


  • अर्धी वाटी कुळीथ पीठ
  • ८-१० कढिलिंबाची पाने
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • अर्धा चमच मीठ
  • कोथिंबीर
  • २ आमसुले
  • २ पळ्या तेल
  • फोडणीचे साहित्य

पाककृती


तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्यांचे तुकडे, कढिलिंबाच्या पाने घालून फोडणी करावी.

त्यात ३ भांडी पाणी घालावे. ते थोडेसे उकळायला लागल्यावर त्यात मीठ, आमसुले घालावीत.

कुळथाचे पीठ पाण्यात कालवून घालावे व ढवळत राहावे.

उकळी आली की खाली उतरवून त्यात कोथिंबीर घालावी व जेवताना भातावर गरम गरम द्यावे.