कोथिंबीरीचे वडे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ जानेवारी २००८

कोथिंबीरीचे वडे | Kothimbir Vade

कोथिंबीरीचे वडे - [Kothimbir Vade] कोथिंबीर आणि डाळीचे पीठ एकत्र करुन तळलेले खमंग, खुसखुशीत कोथिंबीरीचे वडे मधल्या वेळेत किंवा जेवताना चटपटीत प्रकार म्हणून देता येतील.

जिन्नस


  • २ जुड्या कोथिंबीर
  • ७-८ हिरव्या मिरच्या
  • ५-६ लसूण पाकळ्या
  • १ इंच आले बारीक वाटून
  • १ वाटीभर डाळीचे पीठ (बेसन)
  • २ टेबलस्पून बारीक रवा
  • मीठ
  • १ चिमूट खायचा सोडा
  • तळण्याकरता तेल

पाककृती


कोथिंबीर स्वच्छ निवडून बारीक चिरून धुवून कपड्यावर कोरडी करायला थोडा वेळ पसरवावी.

एका परातीत कोरडी झालेली कोथिंबीर, १ वाटीभर डाळीचे पीठ, मिरची, आले-लसूणची वाटलेली गोळी, मीठ व रवा, चिमूटभर सोडा टाकून कालवावेत..

कढईत तेल तापवून तयार पीठाचे वडे करून खरपूस तळावेत.