MarathiMati.com - Android App on Google Play Store

कोहिनूर चटणी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २००८

कोहिनूर चटणी

कोहिनूर चटणी - [Kohinoor Chutney] आवडीची फळे आणि वेगळी चव असलेली ‘कोहिनूर चटणी’ चवीला बदल म्हणून सर्वांनाच आवडेल.

जिन्नस


 • २० लिंबु
 • १॥ कि. साखर
 • १/२ चमच गुलाबपाणी
 • २०० ग्रा. टिन अननस रस व तुकडे किंवा १/२ अननस २०० ग्रा. साखरेत शिजवलेले
 • १ चिक्कु
 • १ सफरचंद
 • २ बब्बुगोशे किंवा नरम नाशपाती
 • ५० ग्रा. चेरी
 • एका डाळिंबाचे दाणे
 • ४ केळी
 • आंबा
 • १ आलुबुखार
 • २० बदाम
 • ५ अक्रोड
 • बारीक कापलेले ५० ग्रा. द्राक्षे
 • थोडेसे मगज

पाककृती


एक ग्लास पाणी जाड बुडाच्या पातेल्यात उकळण्यासाठी ठेवा त्यात साखर टकुन हलवावे व १० मिनिट शिजवावे.

एका लिंबाचा रस टाकुन वरून फेस काढुन गॅसवरून उतरून घ्यावे. पाहिजे तर गाळुन घ्यावे. नाहीतर थंड झाल्यावर एक एक लिंबाचा रस काढुन मिळवित जावा. नंतर त्यात गुलाबपाणी मिळवावे.

जेव्हा सर्व लिंबाचा रस मिसळेल तेव्हा अननसाचा रस टाकुन हलवावे. चाचणीचे मिश्रण पारदर्शक दिसेल तेव्हा रंग पिवळा होईल आता सर्व फळे बारीक कापुन डाळिंब दाण्यासहीत त्यात मिळवावे. अननसाचे तुकडे आसपास सजविण्यासाठी ठेवू शकता.

शेवटी सुखे मेवे टाकुन बरणीत बंद करून ठेवावे. जर अधिक वेळ म्हणजे एक वर्षापर्यंत ठेवायचे असल्यास त्यात पोटेशियम मेटा बाय सल्फाइट चा अर्धा चमचा मिळवून ठेवावे.

टिप : ताजे फळे उपलब्ध तेच टाका.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store