MarathiMati.com - Android App on Google Play Store

कोबीची वडी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ जानेवारी २००८

कोबीची वडी

कोबीची वडी - [Kobichi Vadi] कोबी, बेसन टाकून चटपटीत, खुसखुशीत अश्या वड्या मध्ल्या वेळेत किंवा जेवताना, डब्यात देता येतात.

जिन्नस


 • २०० ग्रॅम कोबी
 • १ मोठी जुडी कोथिंबीर
 • ६-७ हिरव्या मिरच्या
 • १ वाटी डाळीचे पीठ (बेसन)
 • २ चमचे मीठ (चवीनुसार)
 • ३ मोठे चमचे तेल
 • अर्धा चमचा मोहरी
 • अर्धा चमचा जिरे
 • पाव चमचा हिंग
 • अर्धा चमचा हळद
 • तळणीसाठी तेल

पाककृती


कोथिंबीर निवडून बारीक चिरावी. कोबी चिरवी व मिरच्या बारीक वाटाव्या.

तेल तापले की मोहरी, जिरे, हिंग, हळद क्रमाने घालून त्यावर कोबी घालवी. ३-४ मिनिटे ढवळावे. डाळीच्या पिठात मीठ व पाणी घालून गुळगुळीत मिश्रण कालवावे.

कोबीवर हे पीठ ओतावे व मंद आंचेवर शिजू द्यावे. एका थाळीला किंवा ट्रेला तेलाचा हात फिरवून त्यावर हे पीठ थापावे.

तेलाच्या हाताने पृष्ठभाग सारखा करावा. गार झाले की चौकोनी वड्या कपाव्या. तव्यावर बाजूने तेल सोडून परताव्या.

सॉस, चटणीबरोबर खायला द्याव्यात.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store