MarathiMati.com - Android App on Google Play Store

कोबीचा पराठा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जानेवारी २००८

कोबीचा पराठा

कोबीचा पराठा - [Kobicha Paratha] ‘अ’, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्व असलेला कोबी बर्‍याचदा त्याची भाजी खायला आवडत नाही परंतु चटपटीत ‘कोबीचा पराठा’ बनवून न्याहारीला, मधल्या वेळेत किंवा मुलांना डब्यात देता येईल.

जिन्नस


  • ५०० ग्रा. कणीक
  • २०० ग्रा. किसलेली कोबी
  • १ जुडी कापलेली कोथंबीर
  • १ चमचा गरम मसाला
  • १/२ चमचा मीठ
  • ३/४ चमचे लाल मिरची
  • १ तुकडा बारीक कापलेले अदरक
  • २ कापलेली हिरवी मिरची
  • तूप तळणासाठी

पाककृती


कणीक मध्ये एक चिमूटभर मीठ मिळवून घट्ट मळावे.

कोबीत कोथिंबीर, गरम मसाला, उरलेले मीठ, लाल मिरची, आले व हिरवी मिरची टाकुन थोड्याशा तुपात दोन मिनीट फ्राय करून उतरावे.

पिठाचे बरोबर ८ गोळे करावे.

एकास लाटून कोबी भरावा व तव्यावर शेकावी.

अशा पद्धतीने सर्व पराठे बनवून दह्याबरोबर किंवा चटणी सोबत गरम गरम वाढावे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store