खस सरबत

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १० जानेवारी २००८

खस सरबत

उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खसचे सरबत (Khus Sarbat) संजीवनीच ठरु शकेल.

जिन्नस


  • ५० ग्रॅम खसच्या काड्या
  • २ कि. साखर
  • १ लि. पाणी
  • २ लहान चमचे खस एसेंस
  • २ लहान हिरवे रंग
  • १/२ चमचा पोटेशियम मेटा बाय सल्फेट

पाककृती


खस काड्या पाण्यात ८-१० तास भिजवून ठेवावे. नंतर पाणी गाळून घ्या.

या पाण्यात साखर घालून पाक तयार करा.

एका तारेचा पाक झाल्यावर गॅस बंद करा. पाक थंड होऊन द्या.

थंड झाल्यावर त्यात रंग, एसेंस, व पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्या.

सर्व्ह करण्यापूर्वी हलवून ग्लासात अगोदर पाणी, बर्फ व थोडे सरबत मिसळावे.