खव्याचे मोदक

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २००८

खव्याचे मोदक | Khavyache Modak

खव्याचे मोदक - [Khavyache Modak] खव्यापासून बनविलेले खव्याचे मोदक सणासुदीला गोड पदार्थ म्हणून किंवा प्रसाद म्हणूनही देता येईल.

जिन्नस


  • २०० ग्रॅम खवा
  • १०० ग्रॅम पिठीसाखर
  • दोन चहाचे चमचे गुलाबपाणी
  • चार/पाच चहाचे चमचे दूध
  • दोन कांड्या केशर

पाककृती


एका भांड्यात खवा थोडा फेटून घ्या. केशर दुधात कालवून ठेवा.

खवा कोरडा झालेला दिसला की कोरड्या पाट्यावर चांगला वाटा. त्यावर थोडे केशर दूध टाका. मंद आचेवर कढई ठेवा. त्यात खवा घालून परता.

खवा घट्ट होऊ लागल्यावर त्यात थोडी साखर बाजूला काढून बाकी साखर टाका. मिसळा. थोडे घट्ट झाल्यावर उतरवा.

हातावर थोडी थोडी साखर घेऊन खव्याच्या गोळ्यातून थोडे थोडे तयार मिश्रण घेऊन त्याचे मोदक वळा/तयार करा. खा.