खव्याचे गुलाबजाम

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जानेवारी २००८

खव्याचे गुलाबजाम

खव्याचे गुलाबजाम - [Khavyache Gulabjaam] झटपट घरच्या घरी करता येणारे खव्याचे गुलाबजाम सणासुदीला गोड पदार्थ म्हणून देता येईल.

जिन्नस


  • ५०० ग्रॅम खवा
  • १ वाटी बारीक रवा
  • ७५० ग्रॅम साखर
  • थोडा रोझ इसेन्स
  • चिमूटभर खायचा सोडा

पाककृती


खवा पुरणयंत्रातून काढा. नंतर त्यात रवा व सोडा घालून मळा.

वरील मिश्रणाचे ५० गोळे करा.

साखरेत पाणी घालून कच्चा पाक करून त्यात रोझ इसेन्स घाला.

वरील गोळे तुपात तळा व पाकात टाका.

गोळे पाकात टाकताना पाक गरम असावा. अर्धा तास मुरल्यानंतर वाढा.