खजुरची बर्फी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २००८

खजुरची बर्फी

खजुरची बर्फी - [Khajur Barfi] शरीराला आवश्यक असलेल्यापैकी प्रोटीन, फायबर तसेच व्हिटामिन्स खजुर मधून मिळतात तसेच खजुरमुळे हिमोग्लोबीनचे प्रमाणही वाढते अश्या पौष्टिक खजुरची गोड बर्फी रोज खाता येईल.

जिन्नस


  • २०० ग्रॅम बिनबियाचा खजूर
  • अर्धा नारळ
  • १ वाटी साखर
  • अर्धी वाटी दूध
  • ४-५ वेलदोड्यांची पूड
  • २५ ग्रॅम काजू.

पाककृती


थोड्या काजूचे काप करा व बाजूला ठेवा. उरलेल्या काजूची जाडसर पूड करा.

नंतर खजूर, खोबरे, दूध, साखर व काजूचीपूड एकत्र करून गॅसवर ठेवा.

मिश्रण घट्टसर होत आले की वेलदोड्याची पूड घाला.

नंतर घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत थापा. त्यावर काजूचे काप पसरा. नंतर गार झाल्यावर वड्या पाडा.