Download MarathiMati.com's New Android App from Google Play

केळ्याच्या चकल्या

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जानेवारी २००८

केळ्याच्या चकल्या | Kelyachya Chaklya

केळ्याच्या चकल्या - [Kelyachya Chaklya] केळी आणि साबुदाणा मिळून तयार केलेल्या केळ्याच्या चकल्या वाळवल्यामुळे बरेच दिवस टिकतात आणि उपवासालाही चालतात.

जिन्नस


  • एक डझन केळी
  • एक वाटी साबुदाणा
  • हिरवी मिरची
  • जीरे
  • मीठ

पाककृती


कच्ची केळी शिजवून गार झाल्यावर साले काढून घ्या.

नंतर मिक्सर अथवा पुरणयंत्रातून बारीक करून घ्या.

त्यात एक वाटी साबुदाणा भिजवून ठेवा.

त्यात जिरं, मीठ, हिरवी मिरचीची पेस्ट घालून चांगले एकत्र करा.

प्लास्टिकच्या कागदावर चकल्या पाडा आणि उन्हात वाळवा.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play