पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

केळ्याचे पीठ

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ जानेवारी २००८

केळ्याचे पीठ

केळ्याचे पीठ - [Kelyache Pith] उपवासाला चालणारे तसेच मधल्या वेळेत थालिपीठ करता येईल यासाठी हे ‘केळ्याचे पीठ’ वापरु शकता.

उपवासाला चालणारे तसेच मधल्या वेळेत थालिपीठ करता येईल यासाठी हे केळ्याचे पीठ वापरु शकता.

जिन्नस


  • अर्धा डझन कच्ची केळी
  • तीन वाट्या पातळ ताक
  • मीठ

पाककृती


प्रथम केळी सोलून त्याचे पातळ काप करून मीठ घातलेल्या ताकात घालून अर्धा तास भिजत ठेवा.

नंतर एका चाळणीत ते गाळून ताक निघून गेले, की लगेच पातळ कपड्यांवर उन्हात कडक वाळवाव्यात. नंतर त्याचे पीठ करावे.

उपवासाच्या दिवशी हवे तेवढे पीठ घेऊन त्यात दाण्याचे कूट, मीठ, कोथिंबीर, लाल तिखट, चवीपुरती साखर घालून घट्ट पाण्याने मळून तुपावर थालिपीठ भाजावे.

Book Home in Konkan