काश्मीरी पुलाव

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १५ जानेवारी २००८

काश्मीरी पुलाव | Kashmiri Pulao

काश्मीरी पुलाव - [Kashmiri Pulao] अत्यंत पौष्टीक पदार्थांनी युक्त असलेला ‘काश्मीरी पुलाव’ घरातील काही मंगल प्रसंगी करण्यासाठी अत्यंत उत्तम पर्याय आहे, आपल्या घरातील बालगोपाळांसह मोठ्यांनादेखील हा काश्मीरी पुलाव नक्की आवडेल.

जिन्नस


  • बासमती तांदूळ
  • २ कप मिक्स फ्रुट टिन (मिक्स फ्रुट मध्ये अननस, डाळिंबाचे दाणे, चेरी असावयास पाहिजे.)
  • ४०० ग्रा. तूप किंवा तेल
  • २ चमचे काजू
  • १/२ कप मनुका
  • १ कांदा
  • मीठ

पाककृती


तांदुळ धुवून अर्धा तास भिजू द्यावे.

एका भांड्यात २ चमचे तूप टाकावे. तसेच यात कांदा लाल करावा.

कांद्यास हलकासा भुरा झाल्यावर मीठ व तांदुळ टाकावे. पाणी ४ कपापेक्षा कमी ठेवावे.

उकळी आल्यानंतर गॅस कमी करावा. थोडी कमी राहिल्यावर उतरून घ्यावा. त्यात काजू, मनुके मिळवावे.

दुसर्‍या भांड्यात १ चमचा तूप टाकुन अर्धा मिक्स फ्रुट टाकावा आणि हलक्या हाताने उलट-पालट करून झाकून ठेवावे.

भांड्यास तव्यावर ठेवून द्यावे. वाढते वेळी वरून फळे व काजू, मनुके याने सजवावे आणि जर पसंत असेल तर १ चमचे गुलाबजल किंवा केवडा जल शिंपडावे.