काश्मीर पुलाव
Kashmiri Pulao
साहित्य:
- बासमती तांदूळ
- २ कप मिक्स फ्रुट टिन
- ४०० ग्रा. तूप किंवा तेल
- २ चमचे काजू
- १/२ कप मनुका
- १ कांदा
- मीठ
- ( मिक्स फ्रुट मध्ये अननस, चेरी, असावयास पाहिजे )
कृती:
तांदुळ धुवून अर्धा तास भिजू द्यावे. एका भांड्यात २ चमचे तूप टाकावे. तसेच यात कांदा लाल करावा.
कांद्यास हलकासा भुरा झाल्यावर मीठ व तांदुळ टाकावे. पाणी ४ कापापेक्षा कमी ठेवावे. उकळी आल्यानंतर गॅस कमी करावा.
थोडी कमी राहिल्यावर उतरून घ्यावा. त्यात काजू, मनुके मिळवावे.
दुसर्या भांड्यात १ चमचा तूप टाकुन अर्धा मिक्स फ्रुट टाकावा आणि हलक्या हाताने उलट-पालट करून झाकून ठेवावे.
भांड्यास तव्यावर ठेवून द्यावे वाढते वेळी वरून फळे व काजू, मनुके याने सजवावे आणि जर पसंत असेल तर १ चमचे गुलाबजल किंवा केवडा जल शिंपडावे.







