MarathiMati.com - Android App on Google Play Store

काश्मिरी मटण चॉप्स

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

काश्मिरी मटण चॉप्स

काश्मिरी मटण चॉप्स - [Kashmiri Mutton Chopsk] स्टार्टर म्हणुन ‘काश्मिरी मटण चॉप्स’ केल्यास जेवणाला चटपटीत चव येईल.

जिन्नस


 • १० चॉप्स बेस्ट
 • ६ हिरवी वेलची
 • २ चमचे बडीशेप
 • ५ लवंगा
 • २ मध्यम दालचिनीचे तुकडे
 • ४ कप दूध
 • अर्धा वाटी बेसन
 • पाव वाटी मिरचीपूड
 • अर्धा चमचा हिंग
 • १ लिंबाचा रस
 • अर्धा कप तूप

पाककृती


प्रथम वेलची, लवंग, दालचिनी व बडीशेप एका कापडाच्या तुकड्यात बांधून त्याची पुरचुंडी करा.

मोठ्या पसरट पातेल्यात चॉप्स घालून त्यात दूध, अर्धा लिटर पाणी व ही मसाल्याची पुरचुंडी घालून ४० मिनीटे मध्यम गॅसवर चॉप्स शिजेपर्यंत व पाणी आटेपर्यंत ठेवा.

चॉप्स शिजत असतानाच बेसन व तांदळाचे पीठ, थोडे पाणी घालून भाज्याच्या पिठासारखे भिजवा.

पिठामध्ये मीठ, लाल मिरचीपूड, हिंग घालून फेटा.

शिजलेले मटण चॉप्स खाली उतरवून जरा थंडा करा.

कढईत तूप तापवून त्यात चॉप्स पिठात घालून हलकेच सोडा व सोनेरी रंगावर तळून घ्या.

गरमागरम काश्मिरी मटण चॉप्स चटणी वा सॉससोबत सर्व्ह करा.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store