MarathiMati.com - Android App on Google Play Store

कारल्याचे पंचामृत

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ४ जानेवारी २००८

कारल्याचे पंचामृत | Karalyache Panchamrut

कारल्याचे पंचामृत - [Karalyache Panchamrut] शरीरात थंडावा आणि रक्त शुद्धीकरण यामुळे मानसिक शांतता देणारे कारल्याचे पंचामृत अत्यंत उपयुक्त असा पदार्थ आहे, हा मराठमोळा महाराष्ट्रीयन पदार्थ सणासुदीला हमखास केला जातो.

जिन्नस


  • २०० ग्रॅम कारली
  • अर्धी वाटी खोबऱ्याचे पातळ तुकडे
  • अर्धी वाटी तीळ
  • अर्धी वाटी दाण्याचे कूट
  • ५-६ हिरव्या मिरच्या
  • ५-६ कडुलिंबाची पाने
  • अर्धी वाटी चिंचेचा कोळ
  • १ मोठा गुळाचा खडा
  • मीठ
  • तेल
  • मोहरी
  • हळद
  • हिंग

पाककृती


प्रथम कारली बिया काढून बारीक चिरावीत व धुवून पिळून घ्यावीत.

नंतर तेलाची हिंग, हळद, मोहरी, कडुलिंब घालून फोडणी करावी आणि त्यात कारली व पाणी घालून चांगले शिजवावे.

चिंचेचा कोळ, तिळाचे कूट, दाण्याचे कूट व खोबऱ्याचे तुकडे शिजत आलेल्या कारल्यात घालावेत.

नंतर त्यात मिरचीचे तुकडे, मीठ व गूळ घालावा.

चांगले शिजल्यावर पंचामृत तयार होते.

MarathiMati.com - Android App on Google Play Store