कारल्याचे लोणचे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ जानेवारी २००८

कारल्याचे लोणचे

कारल्याचे लोणचे - [Karalyache Lonache] कारले कडू असले तरी आरोग्यास अत्यंत हितकारी असते, कारल्याचे लोणचे केल्यास त्याचा कडवट स्वाद खमंग होतो आणि कडु स्वादामुळे नको नकोसे वाटणारे कारले लहानांपासुन मोठ्यांपर्यत सर्वांसच हवेहवेसे वाटते. एकदा नक्की करून पहावा असा हा पदार्थ आहे.

जिन्नस


  • ४०० ग्रॅम कारली
  • ४-५ चमचे मीठ
  • अर्धी वाटी लोणच्याचा मसाला
  • २ लिंबु

पाककृती


कारली सोलून त्याच्या पातळ चकत्या कराव्या, त्यांना दोन चमचे मीठ चोळून एका फडक्यात बांधून साधारण एक तास पोळपाटाखाली दाबून ठेवाव्यात.

तासानंतर त्या फोडी एका तसराळ्यात घ्याव्यात.

सुटलेले पाणी घेतले नाही तरी चालेल. त्यात लोणच्याचा मसाला, २ चमचे मीठ घालून कालवावे.

लिंबाचा रस काढून त्यावर घालावा.

दोन दिवसानंतर खायला घ्यावे.

महिनाभर हे लोणचे फ्रीजमध्ये ठेवल्यास टिकते.