कांदा लसूण मसाला

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जानेवारी २०१८

कांदा लसूण मसाला प्रकार | Kanda Lasun Masala

कांदा लसूण मसाल्याची पाककृती - [Kanda Lasun Masala Recipe] अस्सल महाराष्ट्रीयन असलेला असा हा ‘कांदा लसूण मसाला’ मुख्यतः उसळ, वरण आणि मसाले भात सारख्या व्यंजनांत आवर्जुन वापरला जातो.

जिन्नस


  • २ - ३ कांदे
  • १५ - २० पाकळ्या लसूण
  • १५० ग्रॅम धणे
  • १५० ग्रॅम सुक्या मिरच्या
  • २ - ३ दालचिनी
  • १ हळकुंड
  • १ टि. स्पून लवंग
  • १० - १२ तमालपत्रे
  • १० मसाला वेलदोडे
  • १ टि. स्पून काळे मिरे
  • ५ टि. स्पून जिरे
  • १ टि. स्पून शहाजिरे
  • १० ग्रॅम दगड फूल
  • ५ ग्रॅम बाद्यान (बदामफुले)
  • ५ ग्रॅम नागकेशर
  • १०० ग्रॅम खसखस
  • १०० ग्रॅम तीळ

पाककृती


  • प्रथम वरील सर्व साहित्य निवडून स्वच्छ करुन घ्या.
  • नंतर सर्व साहित्य थोडया तेलावर वेगवेगळे भाजून घ्या.
  • भाजून झाल्यावर बाजूला गार करायला ठेवा.
  • गार झाल्यावर मिक्सरमध्ये एकत्र करून बारीक करा.
  • तयार कांदा लसूण मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.