MarathiMati.com - Android App on Google Play Store

कांचीपुरम इडली

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

कांचीपुरम इडली

कांचीपुरम ईडली - [Kanchipuram Idli] पोटभर न्याहारी आणि ईडलीचा एक नवीन प्रकार म्हणून ‘कांचीपुरम ईडली’ खायला देता येईल.

जिन्नस


  • २ वाट्या उकडा तांदूळ
  • १ वाटी उडीद डाळ
  • अर्धी वाटी चणा डाळ
  • पाव चमचा हिंग
  • १ चमचा काळी मिरी
  • १ टी. स्पून जीरे
  • थोडे आले किसून
  • थोडा कढीलिंब
  • थोडे काजूचे तुकडे
  • चवीनुसार मीठ

पाककृती


तांदूळ, उडदाची डाळ, चणा डाळ रात्री भिजत घालून सकाळी वाटून पीठ आंबायला ठेवावे.

जीरे व मिरे जाड कुटून, हिंग, मीठ पिठात घाला.

थोडे तेल गरम करुन काजू तुकडे व कढीलिंब तळून तेलासकट पिठात घाला.

आले किसून टाकून पीठ खूप फेटावे.

पीठ फेटून ईडली स्टॅंडवर इडल्या वाफवून घ्याव्यात.

चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.

MarathiMati.com - Android App on Google Play Store