कणकेचे थालिपीठ
Kanakeche Thalipeeth
साहित्य :
- १ वाटी कणिक
- २ चमचे तीळ (पांढरे)
- १ मध्यम कांदा
- २ हिरव्या मिरच्या
- १ चमचा मीठ
- ३ चमचे तेल
- तळण्यासाठी तेल.
कृती :
कांदा व मिरच्या बारीक चिराव्यात. कणकेत घालून पीठ, तीळ व ३ चमचे तेल त्यात मिसळावे. लागेल तसे पाणी वापरून कणिक मऊसर भिजवावी. केळीच्या पानावर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर थापून, तेल सारवलेल्या तव्यावर गुलाबी रंगावर भाजावीत. बाजूने तेल सोडावे व दोन्ही बाजू शेकल्यानंतर गरमगरम खायला द्यावीत. बरोबर लोणी, तूप व आंब्याचे लोणचे द्यावे.




