MarathiMati.com - Android App on Google Play Store

काकडी कांदा रायते

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ३ जानेवारी २००८

काकडी कांदा रायते

अन्नपचनासाठी तसेच उन्हाळ्यात थंडावा देणारे असे काकडी कांद्याचे रायते (Kakadi Kanda Raayate) जेवणाची चव वाढवते.

जिन्नस


  • २ काकड्या
  • २ कांदे
  • २ हिरव्या मिरच्या
  • २ वाट्या दही
  • १ चमचा मीठ (किंवा जास्त)
  • अर्धा चमचा साखर
  • अर्धा चमचा मिरपूड
  • १ चमचा जिरेपूड
  • पाव चमचा लाल तिखट
  • सजावटीसाठी कोशिंबीर

पाककृती


काकड्या व कांदे सोलून बारीक चिरावे. पाणी न घालता दही घुसळावे. मिरच्या उभ्या चिराव्या व मीठ लावून जरा चुरडाव्या.

दह्यात चिरलेले पदार्थ घालावेत. साखर व तिखट घालावे. वाढायच्या भांड्यात काढून ठेवावे.

वरून जिरेपूड, मिरपूड व असल्यास कोथिंबीर घालून फ्रीजमध्ये ठेवावे. जेवणाचे वेळी थंडगार असावे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store