काजूची बर्फी
Kajuchi Barfi
साहित्य :
- १०० ग्रॅम काजू तुकडा
- १ नारळ
- २ वाट्या साखर
- अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स
- २ टेबल चमचा तूप.
नारळ खरवडून घ्या. काजू थोडा वेळ पाण्यात भिजत घाला. नंतर वाटून घ्या. खोबरेही वाटून घ्या.एका जाड बुडाच्या पातेल्यात खोबरे, काजू व साखर एकत्रकरा. मध्यम आचेवर मिश्रण ढवळत राहावे. दाटसर होत आले की इसेन्स घालावा. कडेन तूप सोडावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत. ओतावे व थापावे. नंतर वड्या पाडाव्या.





