काजूची बर्फी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जानेवारी २००८

काजूची बर्फी

काजूची बर्फी - [Kaju Barfi] खोबरे आणि तुप यामुळे ‘काजूची बर्फी’ अधिक खमंग लागते, सणावाराला हमखास केला जाणारा हा पदार्थ आहे. काजू हे उष्ण आणि पित्तवर्धक असल्याने पित्तचा विकार असल्यास हा पदार्थ बेताने खाल्यासच बरे. थंडीच्या दिवसात मात्र हा पदार्थ आवर्जून खावा. छोट्यांचा तर हा पदार्थ अत्यंत आवडीचा आहे.

जिन्नस


  • १०० ग्रॅम काजू तुकडा
  • १ नारळ
  • २ वाट्या साखर
  • अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स
  • २ टेबल चमचा तूप.

पाककृती


नारळ खरवडून घ्या.

काजू थोडा वेळ पाण्यात भिजत घाला. नंतर वाटून घ्या. खोबरेही वाटून घ्या.

एका जाड बुडाच्या पातेल्यात खोबरे, काजू व साखर एकत्र करा.

मध्यम आचेवर मिश्रण ढवळत राहावे.

दाटसर होत आले की इसेन्स घालावा. कडेने तूप सोडावे.

मिश्रण चांगले घट्ट झाले की तूप लावलेल्या थाळीत ओतावे व थापावे. नंतर वड्या पाडाव्या.