कैरीचे पन्हे - प्रकार १

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २००८

धणे-जिरे कसाय

कैरीचे पन्हे - प्रकार १ - [Kairiche Panhe Type 1] उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी तसेच पचनशक्ती वाढवण्यासाठी कैरीचे पन्हे उपयोगी ठरते.

जिन्नस


  • ५०० ग्रॅम कैऱ्या
  • साखर
  • १ चमचा मीठ

पाककृती


कैरीची साले काढून त्या अख्ख्या किंवा फोडी करून स्टीलचा भांड्यातून कुकरमध्ये उकडून घ्याव्यात.

थंड झाल्यावर कैरीचा गर व साखर मिक्सरमधून अथवा पुरणयंत्रामधून काढावा.

जेवढा गर असेल त्याच्या अडीच पट साखर घातली तर ते व्यवस्थित गोड होते व हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकते.

पन्हे करताना थोड्या गरात थंड पाणी व किंचित मीठ घालावे. आणि प्यायला द्यावे. याची चव फारच छान लागते.