कडबोळी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जानेवारी २००८

कडबोळी | Kadboli

कडबोळी - [Kadboli] बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग महाराष्ट्रीयन कडबोळीची पाककृती खासकरुन दिवाळीला बनवली जाते.

जिन्नस


  • २ भांडी कडबोळ्याची भाजाणी
  • दीड चमचा मीठ
  • अर्धा चमचा हळद
  • अर्धा चमचा हिंग
  • २ चमचे लाल तिखट
  • २ चमचे धणे पूड
  • १ चमचा जिरे पूड
  • १ चमचा ओव्याची पूड
  • पाव वाटी तीळ
  • ४०० ग्रॅम तेल

पाककृती


भाजाणीत अर्धी वाटी गरम तेल व वरील सर्व साहित्य घालून पीठ चकलीच्या भाजणीप्रमाणे भिजवावे.

हाताने चकलीप्रमाणे छोटी छोटी भुईचक्राएवढी कडबोळी करून मंद आचेवर तळावीत.

कडबोळी १०-१५ दिवस छान टिकतात.