कडबोळी प्रकार २

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

कडबोळी प्रकार २ | Kadboli Type 2

कडबोळी प्रकार २ - [Kadboli Type 2] बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग कडबोळीची दुसरी पाककृती सर्व वयोगटातील खवैयांना आवडेल.

जिन्नस


  • ५०० ग्रॅम बाजरी
  • २५० ग्रॅम ज्वारी
  • २५० ग्रॅम तांदूळ
  • २५० ग्रॅम हरभऱ्याची डाळ
  • २५० ग्रॅम गहू
  • ५० ग्रॅम धणे
  • तिखट
  • मीठ
  • तीळ
  • कडकडीत तेलाचे मोहन

पाककृती


वरील धान्ये वेगवेगळी भाजावी. नंतर गिरणीतून जरा जाडसर दळून आणावी.

आपल्याला जेवधे पीठ हवे असेल तेवढे घ्या.

त्यात तिखट, मीठ, थोडे तीळ व कडकडीत तेलाचे मोहन घाला व गरम पाण्याने पीठ भिजवा. नंतर मळून घ्या.

बरीचशी कडबोळी वळून घ्या. नंतर मंदाग्निवर तळा.

विस्तव प्रखर असेल तर बाहेरून कडबोळी लाल होतात.

पण आत कच्ची रहातात. म्हणून तळताना नीट तळावी.