पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

काबुली चणे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ जानेवारी २००८

काबुली चणे

काबुली चणे - [Kabuli Chane] हरभर्‍याचा एक प्रकार असलेला ‘काबुली चणे’ पासून बनवलेली खासकरुन उत्तर भारतातील प्रसिद्ध चमचमीत, मसालेदार अशी ही पंजाबी डिश भाताबरोबर किंवा रोटीबरोबर छान लागेल.

जिन्नस


 • ३ कप काबुली चणे
 • ३ मोठी विलायची
 • ४ छोटी विलायची
 • ४ लवंग
 • १ चमचा मीठ
 • १ तुकडे आले
 • १ चमचा खाण्याचा सोडा
 • १० कप पाणी

मसाल्यासाठी साहित्य

 • ४ छोटे चमचे आमचूर
 • ४ चमचे गरम मसाला
 • २ चमचे काळी मिरी
 • १ चमचा मीठ
 • १ चमचे काळे मीठ
 • २ चमचे भाजून झालेले जीरे
 • ४ हिरव्या मिरच्या
 • २५० ग्रॅ. बटाटे
 • १ तुकडा आले
 • २ टोमॅटो

पाककृती


३ कप चणे, १० कप पाण्यामध्ये आले, मोठी विलायची, लवंग, दालचीनी, खायचा सोडा, मीठ टाकुन रात्रभर भिजू देणे.

सकाळी कुकरमध्ये १ शिटी होईपर्यंत उकडावे व काढुन कढईत टाकावे नंतर चण्याचे उकडलेले पाणी यात टाकावे. हे पाणी शिजत राहते.

चण्यावर सर्व वाटलेला मसाला पसरून देणे. तसेच थोडे पाणी टाकावे.

बटाट्याच्या चार चार तुकड्यांना चण्यावर सजवावे, हिरवी मिरची उभी करून चण्यावर व गरम तेल टाकावे तसेच वाढतांना लिंबू पिळावा व कोथींबीरने सजवावे.

Book Home in Konkan