Download MarathiMati.com's New Android App from Google Play

ज्वारीचे धपाटे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जानेवारी २००८

ज्वारीचे धपाटे

ज्वारीचे धपाटे - [Jwariche Dhapate] ज्वारीच्या पिठात कांदा टाकून भाजलेली गरमागरम, खुशखुशीत आणि टिकाऊ असल्यामुळे ज्वारीचे धपाटे प्रवासालाही नेता येतात.

जिन्नस


  • ३ वाट्या ज्वारी पीठ
  • १ वाटी कांदा किसून
  • १ टी स्पून लसूण
  • १ टे. स्पू. प्रत्येकी दाणेकूट व तीळकूट
  • १/२ वाटी कोथिंबीर
  • तिखट
  • मीठ
  • तेल

पाककृती


ज्वारीचे पीठ चाळून घ्या. तेल सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र मळावे.

पातळ भाकरीप्रमाणे थापावे. गॅसवर तवा गरम करत ठेवावा.

तवा तापल्यावर ही धपाटी तेल टाकून लालसर होईपर्यंत भाजावे. तयार आहे गरम गरम धपाटी..! दही किंवा चटणी सोबत खावीत.

ही धपाटी ७-८ दिवस टिकतात, आणि ही प्रवासासाठी अधिक उपयुक्त.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play