MarathiMati.com - Android App on Google Play Store

झटपट रवा डोसा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २००८

झटपट रवा डोसा

झटपट रवा डोसा - [Jhatpat Rava Dosa] भुक लागली असता झटपट करता येण्यासारखा हा रव्याचा डोसा आहे, कुरकुरीत आणि खमंग असा झटपट रवा डोसा मोठ्यांसह लहानग्यांना पण नक्कीच आवडेल.

जिन्नस


  • १ वाटी बारीक रवा
  • १ वाटी तांदळाची पिठी
  • १ वाटी मैदा
  • १ वाटी आंबट दही
  • तेल
  • मीठ

पाककृती


डोसे करायच्या आधी २ तास १ वाटी बारीक रवा, १ वाटी तांदळाची पिठी, १ वाटी मैदा, १ वाटी आंबट दही घालुन सरसरीत भिजवावे.

त्यात २ टेबलस्पून कडकडीत तेल व चवीला मिठ घालावे.

डोशाकरता मिठाचे पाणी लावून तयार केलेल्या तव्यावर डावाने पातळ धिरड्याप्रमाणे डोसा घालावा व पाव चमचा तेल सोडून हलकेच काढून चटणीबरोबर खाण्यास द्यावा.

MarathiMati.com - Android App on Google Play Store