इंद्रधनुषी सॅलेड

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २००८

इंद्रधनुषी सॅलेड

इंद्रधनुषी सॅलेड - [Indradhanushi Salad] सर्व रंगीत भाज्या आणि मीठ, मिरची व चाट मसाला टाकून चटपटीत इंद्रधनुषी सॅलेड तयार.

जिन्नस


 • ४ काकडी
 • २ बीट
 • ४ गाजर
 • ४ मुळा
 • २ टॉमेटो
 • २ लिंबू
 • ७-६ सॅलेडची पाने
 • ४ हिरवी मिरची
 • १ लहान चमचा मीठ
 • १/२ लहान चमचा काळी मिरी पावडर
 • १ लहान चमचा चाट मसाला

पाककृती


बीट, २ मुळा, २ गाजर, किसून घ्या. काकडी लिंबू व टॉमेटो गोल चिरुन घ्या. आता उरलेला २ मुळा व २ गाजर लांब चिरा.

एका डिशमध्ये सॅलेडची पाने सजवा, मधोमध किसलेला मुळा, गाजर व बीट ठेवा. चारी बाजुला चिरलेला मुळा, गाजर, काकडी, लिंबू, टॉमेटो व हिरवी मिरची सजवा.

वरून मीठ, मिरची व चाट मसाला टाकून सॅलेड तयार.