MarathiMati.com - Android App on Google Play Store

हुसैनी कबाब मसाला

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २००८

हुसैनी कबाब मसाला

हुसैनी कबाब मसाला - [Hussaini Kabab Masala] सर्व प्रकारच्या भाज्या घालून चटपटीत चवीचे पौष्टिक ‘हुसैनी कबाब मसाला’ स्टार्टरला तसेच लहान मुलांना मधल्या वेळेत, न्याहारीला सुद्धा खायला देता येईल.

जिन्नस


  • २ उकळलेले बटाटे
  • २ गाजर
  • १०० ग्रा. फेंच बीन्स
  • १ कांदा
  • २ चमचे टोमॅटो सॉस
  • ५० ग्रा. काजू
  • १०० ग्रा. वाटाणे
  • थोडासा पुदीना
  • २ चमचे लाल मिरची
  • एक लिंबाची खाप
  • १ चमचे साखर
  • १०० ग्रा. कॉर्नफ्लोअर
  • चवीनुसार मीठ
  • थोडासा गरम मसाला
  • पालक ग्रेवी
  • हिरवी चटणी
  • चीज

पाककृती


गाजर, वाटाणे आणि फ्रेंच बिन्स उकळून घ्यावे त्यानंतर व पाण्यात काढून कुस्करून घ्यावे.

बटाटे आणि पुदीना बारीक कापून यात टाकावा आणि सर्व सामग्रीस व्यवस्थित मिळवावे. नंतर यात लिंबू पिळून साखर व मसालाही टाकावा.

आता याचे छोटे छोटे गोळे बनवावे आणि ह्या गोळ्यांना कॉर्नफ्लोअरमध्ये गुंडाळून लालसर होईपर्यंत तळावे.

नंतर पालक ग्रेवी, हिरवी चटणी व चीज याबरोबर गोळे प्लेटमध्ये सजवावे.

MarathiMati.com - Android App on Google Play Store