हॉट अँण्ड सॉर चिली सूप

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ जानेवारी २००८

हॉट अँण्ड सॉर चिली सूप

हॉट अँण्ड सॉर चिली सूप - [Hot And Sour Chilly Soup] भूक वाढवणारे आणि थंडीत खासकरुन सर्दी झाल्यास उपयुक्त असे पौष्टिक ‘हॉट अँण्ड सॉर चिली सूप’ पिल्यास फायदा होईल.

जिन्नस


  • १ कप कोबी
  • १ कप गाजर
  • २ चमचे व्हिनेगर
  • २ चमचे कॉर्नफ्लावर
  • १/२ लहान चमचा काळी मिरी पावडर
  • मीठ आवश्यकतेनुसार
  • १/२ लहान चमचा लाल मिरची पावडर
  • १ मोठा चमचा चिली सॉस
  • २ लहान चमचे तेल

पाककृती


कोबी व गाजर बारीक चिरुन घ्या. एका भांड्यात तेल व लाल मिरची घ्या.

कोबी व गाजर टाकून परतून घ्या. १ ग्लास पाणी टाकून हलवा.

उकळी आल्यावर चिली सॉस टाका. मीठ व काळी मिरी पावडर टाका. थोड्याश्या पाण्यात कॉर्नफ्लावर टाका.

हे मिश्रण सूपमध्ये टाका व हालवत रहा. ५ मिनीटांनी गॅस बंद करा.

व्हिनेगर टाकून गरम-गरम सूप वाढा.