MarathiMati.com - Android App on Google Play Store

गुजराती कढी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ जानेवारी २००८

गुजराती कढी

गुजराती कढी - [Gujarati Kadhi] गुजरातची प्रसिद्ध आणि उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारी अशी ‘गुजराती कढी’ जीरा राईस सोबत खायला चांगली लागते.

जिन्नस


  • ८-१० वाट्या बेताचे आंबट ताक
  • ५-६ मिरच्या
  • आल्याचा तुकडा
  • २ टेबलस्पून डाळीचे पीठ (बेसन)
  • मीठ
  • थोडासा गूळ
  • २-३ लवंगा
  • १ दालचिनीचा तुकडा
  • १/२ चमचा मोहरी

पाककृती


मिरच्या, आले, मोहरी, लवंग, दालचिनी हे पदार्थ वाटून घ्यावेत व ताकात घालावेत.

डाळीचे पीठ थोड्या पाण्यात कालवून घ्यावे व ताकात घालावे.

गूळ व मीठ घालून कढीला उकळी आणावी. थोडा कढीलिंब व कोथिंबीर टाकावी.

नंतर हिंग, जीरे व ५-६ छोट्या लाल मिरच्या घालून तुपाची फोडणी द्यावी.

ही कढी थोडी दाट असते. हळद घालू नये.

MarathiMati.com - Android App on Google Play Store