हिरवे कबाब
हिरवे कबाब - [Green Kebab] सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करुन तळलेले खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक असे हिरवे कबाब मधल्या वेळेत किंवा जेवताना स्टार्टर म्हणून देता येतील.
जिन्नस
- पालकाची ५ मोठी पाने
- ५० ग्रॅ. मेथी (बारीक कपलेली)
- ५० ग्रॅ. गाजर (बारीक कापलेले)
- ५० ग्रॅ. फ्रेंच बीन्स ( बारीक कापलेली)
- ५० ग्रॅ. मटार ( वाटलेले )
- २०० ग्रॅ. बटाटे ( शिजलेले )
- ४ हिरव्या मिरच्या
- ५ ग्रॅ. जीरे पावडर ( भाजलेले )
- १०० ग्रॅ. आले
- ५ ग्रॅ. लसूण
- २० ग्रॅ. कांदा
- चवीनुसार मीठ
- ब्रेड क्रम्ब्स आवश्यकतेनुसार
पाककृती
पालक, मेथी, गाजर, फ्रेंच बीन्स, मटार, उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, जीरे पावडर, आले, लसूण, कांदा, मीठ इ. मिळवून एकत्र मिश्रण बनवुन घ्या.
ह्या मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे बनवावे.
दोन्ही बाजूस चांगल्या तर्हेने ब्रेड क्र्म्ब्स लावल्यानंतर व्यवस्थित तळावे परंतु लक्षात ठेवावे इतकेच तळावे कि त्याचा रंग हिरवाच राहील
गरमागरम आपल्या मनपसंद चटणी किंवा सॉसबरोबर खाण्यास द्यावे.