पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

मिरचीचे लोणचे

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २००८

मिरचीचे लोणचे

जेवणाला चटकदार मिरचीच्या लोणच्याने (Green Chilly Pickle Recipes) अजून स्वाद येतो.

जिन्नस


  • १ किलो लांबट हिरवी मिरची
  • २ वाट्या मोहरीची डाळ
  • अर्धा चमचा मेथीची (कच्ची) पूड
  • दीड चमचा हळद
  • चमचे हिंग
  • २॥ ते ३ वाट्या मीठ
  • १२ लिंबांचा रस
  • १ वाटी तेल

पाककृती


एका मध्यम आकाराच्या परातीत किंवा ताटात मोहरीची डाळ, मेथीपूड, हळद व हिंग घालावे. लहान पातलीत तेल कडकडीत तापवावे. धूर दिसेपर्यंत तापले की परातीतल्या जिनसांवर ओतावे व झार्‍याने ढवळावे. मसाला एकत्र कालवला गेला की गार होऊ द्यावा.

मिरच्या धुवून फडक्यावर कोरड्या होऊ द्याव्यात. त्यांचे आपल्या आवडीनुसार बेताचे तुकडे करावे. मिरची यंत्रात बारीक केली तरी बिघडत नाही. त्यात ४ चमचे वगळून बाकीचे मीठ मिसळावे. गार झालेल्या मोहरीच्या डाळीचा मसाला घालावा. उन्हात ठेवलेल्या बरणीत तळाला २ चमचे मीठ घालावे. बरणी गार असावी. त्यात मिरच्या व मसाला कालवून भरावा. वरून दोन चमचे मीठ घालावे. दु्सर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी बारा लिंबाचा रस काढून लोणच्यात घालावा.

लिंबाच्या साली फेकून देऊ नयेत. सालीचेही चवदार लोणचे बनवता येते.

Book Home in Konkan