गोडा मसाला

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जानेवारी २०१८

गोडा मसाला प्रकार | Goda Masala

गोडा मसाल्याची पाककृती - [Goda Masala Recipe] तीळ, खोबरे, खसखस सारखे पदार्थ वापरून बनविलेला ‘गोडा मसाला’ चवीला काहीसा गोडसरच असतो. मटकीची उसळ, कटाची आमटी, मिसळ पाव, आमटी डाळ, भरली भेंडी, तोंडलीची भाजी सारख्या व्यंजनामध्ये ‘गोडा मसाला’ आवर्जून वापरला जातो.

जिन्नस


 • १/२ किलो धणे
 • १/४ किलो सुकं खोबरं
 • १/४ किलो तीळ
 • ५० ग्रॅम खसखस
 • ५० ग्रॅम हळकुंड
 • २० ग्रॅम लवंग
 • २० ग्रॅम दालचीनी
 • २० ग्रॅम काळे मिरे
 • २० ग्रॅम तमाल पत्र
 • २० ग्रॅम मसाला वेलदोडे
 • २० ग्रॅम दगड फुल
 • २० ग्रॅम खडा हिंग
 • १० ग्रॅम जायपत्री
 • १० ग्रॅम बाद्यान (बदामफुले)
 • १०० ग्रॅम जीरे

पाककृती


 • प्रथम वरील सर्व साहित्य निवडून घ्या.
 • खोबर्‍याचे तुकडे करून किसून भाजून घ्या.
 • तीळ कोरडेच भाजून घ्या.
 • बाकीच सर्व पदार्थ थोडया तेलावर वेगवेगळे भाजून घ्या.
 • गार झाल्यावर मिक्सरवर बारीक पूड करा व चाळून घ्या.
 • तयार गोडा मसाला घट्ट झाकणाच्या बरणीत भरा.