गोड शंकरपाळी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जानेवारी २००८

गोड शंकरपाळी

गोड शंकरपाळी - [God Shankarpali] सणासुदीला खासकरुन केली जाणारी ‘गोड शंकरपाळी’ तुम्ही इतर वेळीही करुन मुलांना पटकन खाण्यासाठी देवू शकता. खुससुशीत गोड शंकरपाळी झटपट तयार..!

जिन्नस


  • ५०० ग्रॅम मैदा
  • १२५ ग्रॅम पिठीसाखर
  • ३ टे. चमचा घट्ट डालडाचे मोहन
  • अर्धा चमचा मीठ
  • ४-५ वेलदोड्याची पूड

पाककृती


डालडा तूप फेसून घ्या. नंतर त्यात पिठीसाखर घालून फेसा.

नंतर त्यात मैदा व इतर वस्तू घालून दुधात किंवा पाण्यात पीठ घट्ट भिजवा.

नंतर तासाभराने चांगले मळून शंकरपाळे करून तेलात तळावे.