पाककला | Maharashtrian Recipes

गोड भाकरी

God Bhakari

साहित्य :

  • दीड वाटी कणिक
  • अर्धी वाटी गूळ
  • पाव चमचा मीठ
  • २ चमचे साजूक तूप
  • अर्धी वाटी पाणी
  • तळण्यासाठी तूप

कृती :

गूळ पाण्यात विरघळला की पाणी गाळून घ्यावे. कणकेत तुपाचे मोहन, मीठ घालून गुळाच्या पाण्याने पीठ भिजवावे. पीठ घट्ट असावे. लागल्यास थोडे पाणी किंवा कणिक यांचे प्रमाण वाढवावे. अर्धा तास झाकून ठेवावे. त्याच्या नेहमीसारख्या भाकऱ्या लाटून तव्यावर भाजाव्या. दोन्ही बाजूंवर थोडे तूप सोडून चुरचुरीत परताव्या. एका ताटात पसरून गार होऊ द्याव्यात.

गंमत म्हणून एखादेवेळी त्यावर काजूचे काप भाकरी लाटतानाच पसरावेत म्हणजे लाटण्याने दाबले जातात. ही काजूची गोड भाकरी लोणी किंवा तूप व लोणचे, कोशिंबीर याबरोबर खावी.

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony