गाजर कोबीचे सॅलड

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जानेवारी २००८

गाजर कोबीचे सॅलड | Gajar Kobi Salad

गाजर कोबीचे सॅलड - [Gajar Kobi Salad] TEXT

जिन्नस


  • २ वाट्या बारीक चिरलेली कोबी
  • १ वाटी बारीक चिरलेली गाजरे
  • १ वाटी बारीक चिरलेली भोपळी मिरची
  • २ चमचे किसलेला कांदा
  • अर्धी वाटी दही
  • अर्धी वाटी क्रीम किंवा मेयोनेझ
  • १ चमचा साखर
  • १ चमचा मीठ
  • पाव चमचा मिरपूड

पाककृती


भाज्या एकत्र कराव्या. दही, क्रीम, साखर, मीठ व मिरपूड घालून वेगळे ढवळावे. बाजारी क्रीम नसल्यास घरची साय घोटून घालावी. तेही न जमल्यास दह्याचे प्रमाण दुप्पट करावे. मात्र दही आंबट नसावे. पसरट भांड्यात भाज्या घालून त्यावर दही हलकेच ओतावे. अलगद भांडे मिसळावे. फ्रीजमधे ठेवून थंडगार झाल्यानंतर खावे.

आवडीनुसार भाजलेले किंवा भिजवलेले शेंगदाणे, काजू किंवा अक्रोडाचा भरड चुरा किंवा भाजके चणे करून घालावे.