गाजर हलवा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २००८

गाजर हलवा | Gajar Halwa

गाजर हलवा - [Gajar Halwa] थंडीच्या दिवसात गाजर फार छान मिळतात. तर मग चला आज आपण गाजर हलवा करुयात.

जिन्नस


  • १ किलो मोठी गाजरे
  • ३ वाट्या साखर
  • पाव किलो खवा
  • अर्धी वाटी तूप
  • ७-८ वेलदोड्याची पूड
  • थोडेसे काजूचे काप

पाककृती


गाजरे किसून घ्या. नंतर हा कीस साध्या कुकरात ठेवून वाफवून घ्या. पाणी घालू नये.

नंतर वाफेचे पाणी निथळून घ्या. तुपावर हा कीस परतून घ्या. साखर घाला.

साखरेचा पाक होऊन मिश्रण घट्टसर झाले की उतरा. खवा हाताने मोडून घ्या व थोड्या तुपावर परतावा. गाजराच्या मिश्रणात हा खवा घाला.

वेलदोड्याची पूड व काजूचे काप घाला. नीट ढवळून मिश्रण सारखे करावे.