MarathiMati.com - Android App on Google Play Store

गाजर द्राक्षे कोशिंबीर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जानेवारी २००८

गाजर द्राक्षे कोशिंबीर | Gajar Drakshe Koshimbir

गाजर द्राक्षे कोशिंबीर - [Gajar Drakshe Koshimbir] गाजर आणि द्राक्षे घालुन केलेली कोशिंबीर चविला अत्यंत चटकदार लागते, सोबत मेयोनेझ आणि खमंगपणा येण्यासाठी तिखट आणि मिरपूड असल्याने जेवणातली चव वाढते. दुपारच्या जेवणात आणि खास करून पाहूनचारासाठी ही कोशिंबीर एक वेळ नक्की करून पहावी.

जिन्नस


  • २ वाट्या गाजराचा कीस (गुलाबी गाजरे जास्त छान दिसतात)
  • १५-२० बिनबियांची(सीडलेस) द्राक्षे
  • १ चमचा खसखस
  • १ चमचा मीठ
  • अर्धा चमचा साखर
  • पाव चमचा लाल तिखट किंवा मिरपूड
  • १ वाटी मेयोनेझ किंवा १ वाटी घरचा चक्का
  • अर्धी वाटी सायीचे दही

पाककृती


द्राक्षे धुवून अर्धीअर्धी चिरावीत.

सर्व जिन्नस एकत्र करावेत व चार तास कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवावी.

शक्यतोवर पांढर्‍या भांड्यात किंवा केळीच्या पानावर ठेवून टेबलावर न्यावी.

MarathiMati.com - Android App on Google Play Store