फ्रूट पंच

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जानेवारी २००८

फ्रूट पंच

लिंबू, संत्री आणि अननसाचा रस असलेले फ्रूट पंच (Fruit Punch) थकवाही घालवते आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असे थंडपेय आहे.

जिन्नस


  • ४ कप गार पाणी
  • ५०० ग्रॅम साखर
  • २ कप संत्र्याचा रस
  • १ कप लिंबाचा रस
  • २ कप अननसाचा रस

पाककृती


साखरेत पाणी घालून १० मिनीटे उकळ्वावे.

नंतर गार झाल्यावर सर्व रस त्यात ओतून फ्रीजमध्ये अगदी थंडगार करावा.

आयत्या वेळी त्यात अगदी थंडगार पाणी घालून सर्व्ह करावे.