Download MarathiMati.com's New Android App from Google Play

फ्रूट केक

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २००८

फ्रूट केक

फळांनी बनवून केलेला हा फ्रुट केक (Fruit Cake) १५ दिवस छान राहतो.

जिन्नस


 • १ कप साखर
 • १ १/२ कप लोणी किंवा डालडा
 • २ संत्री
 • ५ अंडी
 • २ १/२ कप मैदा
 • १ टी स्पून बेकिंग पावडर
 • १/२ चमचा मीठ
 • ५० ग्रॅम बारीक चिरलेले काजू
 • ५० ग्रॅम करंट्स
 • ५० ग्रॅम बेदाणा
 • २५ ग्रॅम चेरीज्‌
 • २५ ग्रॅम संत्र्याची पाकवलेली साल
 • १० ग्रॅम साल काढलेले बदाम

पाककृती


डब्याला पातळ डालडा लावून ठेवावा. ओव्हनचे तापमान ३७५ डि. F. असावे किंवा १५० डि. C असावे. लोणी व साखर खूप फेसून घ्यावे.

अंड्यातले पिवळे व पांढरे बाजूला करुन पांढरे खूप फेसून घ्यावे. पिवळेही थोडे फेसून घ्यावे व लोणी साखरेत मिसळावे, नंतर त्यात चाळलेला मैदा, मीठ व बेकिंग पावडर हळुहळु घालावे.

थोड्या मैद्यात (१ टे.स्पू) फ्रूटचे तुकडे घोळवून तेही घालावेत. संत्र्याचा रस थोडा थोडा घालत मिश्रण सारखे करावे.

नंतर डालडा लावलेल्या डब्यात घालून वरच्या बाजूला बदामाचे काप लावावेत.

नंतर १ ते १॥ तास बेक करावा. केकमध्ये विणायची सुई घालून काढावी, स्वच्छ आली की केक झाला असे समजावे.

हा केक १५ दिवस छान राहतो.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play