Download MarathiMati.com's New Android App from Google Play

फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ जानेवारी २००८

फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी

फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी - [Flower Cheese Kofta Curry] आपण बर्‍याचदा शिजलेल्या फ्लॉवरच्या वासामुळे फ्लॉवरची भाजी खान्यास टाळाटाळ करतो मात्र ‘फ्लॉवर व चीझ कोफ्ता करी’ मध्ये चीझ - फ्लॉवरचे कोफ्ते आणि सोबत करी एकुन भाजीला एक वेगळी चव देतात, कोफ्ते प्रकारातील भाज्या आवडत असल्यास हा प्रकार एकदा नक्की करून पहावा, लहान मुलांच्या अत्यंत आवडीचा हा भाजीचा प्रकार आहे.

जिन्नस


 • १/२ किलो फ्लॉवर
 • ३-४ हिरव्या मिरच्या
 • १/२ लिंबाचा रस
 • ६० ग्रॅम चीझ
 • ३ ब्रेडचे स्लाईस
 • १/४ चमचा गरम मसाला
 • थोडेसे वाटलेले आले
 • थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • मीठ

ग्रेव्हीसाठी जिन्नस


 • २ मोठे कांदे
 • १ मोठा टोमॅटो

मसाला


 • ५-६ लसूण पाकळ्या
 • १ आल्याचा लहानसा तुकडा
 • १/२ चमचा धणे
 • १ चमचा जीरे
 • १/४ चमचा हळद
 • १ चमचा हळ्द
 • १ चमचा तिखट
 • मीठ

पाककृती


फ्लॉवर किसून घ्यावा व अगदी थोड्या पाण्यात शिजवून घ्यावा. सर्व पाणी आटले पाहिजे.

नंतर त्यात किसलेले चीझ बारीक चिरलेल्या मिरच्या, लिंबू रस, मीठ, आले, लसूण, गरम मसाला घालावा.

ब्रेडचा स्लाईस पाण्यात भिजवून हाताने दाबून त्यातले पाणी काढून टाकावे व तो फ्लॉवरच्या मिश्रणात घालावा.

मिश्रण चांगले मळून घ्यावे व त्याचे छोटे छोटे गोळे करुन तळून घ्यावेत.

ग्रेव्हीसाठी मसाला बारीक वाटून ठेवावा. थोड्या तुपावर कांदा परतून घ्यावा. त्यावर वाटलेला मसाला घालून परतावा.

नंतर त्यावर टोमॅटोचा रस घालावा. रस जरा दाटसर झाला की त्यात तळलेले कोफ्ते घालावे.

आयत्या वेळी वरुन थोडासा गरम मसाला व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play