सणासुदीचे पदार्थ
सणासुदीचे पदार्थ - [Festival recipes]सणासुदीच्या विविध पदार्थांच्या पाककृती(सणासुदीचे पदार्थ), Various types of Festival recipes.
सणासुदीचे पदार्थ - [Festival recipes]सणासुदीच्या विविध पदार्थांच्या पाककृती(सणासुदीचे पदार्थ), Various types of Festival recipes.
झटपट घरच्या घरी करता येणारे खव्याचे गुलाबजाम सणासुदीला गोड पदार्थ म्हणून देता येईल.
बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गव्हासारखे सर्वच पौष्टीक धान्ये असलेली कुरकुरीत आणि खमंग महाराष्ट्रीयन कडबोळीची पाककृती खासकरुन दिवाळीला बनवली जाते.
खोबरे आणि तुप यामुळे ‘काजूची बर्फी’ अधिक खमंग लागते, सणावाराला हमखास केला जाणारा हा पदार्थ आहे. काजू हे उष्ण आणि पित्तवर्धक असल्याने पित्तचा विकार असल्यास हा पदार्थ बेताने खाल्यासच बरे. थंडीच्या दिवसात मात्र हा पदार्थ आवर्जून खावा. छोट्यांचा तर हा पदार्थ अत्यंत आवडीचा आहे.
शरीरात थंडावा आणि रक्त शुद्धीकरण यामुळे मानसिक शांतता देणारे कारल्याचे पंचामृत अत्यंत उपयुक्त असा पदार्थ आहे, हा मराठमोळा महाराष्ट्रीयन पदार्थ सणासुदीला हमखास केला जातो.
स्वादिष्ट, पौष्टिक आणि हलकाफुलका असा ‘संत्र्याचा केशर भात’ सण-उत्सवानिमित्त केला जाऊ शकतो, संत्र्याचा चटकदार स्वाद असल्याने बालगोपाळांना देखील हा पदार्थ अत्यंत आवडीचा आहे. सणा-उत्सवाला तर एकवेळ नक्की करून पाहावा असा हा भाताचा प्रकार आहे.